उपचारानंतर ऋषी कपूरांचा कमबॅक

    दिनांक :27-Jun-2019
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते, आप्तेष्ट त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यातच आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
 
 
ऋषी कपूर ‘झूठा कहीं का’ या चित्रपटामध्ये झळकणार असून हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत ओमकार कपूर, समी सिंह आणि जिमी शेरगिल स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर तरण आदर्श यांनी शेअर केलं आहे.
 
 
शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये ऋषी कपूर आणि जिमी शेरगिल दिसत असून त्यांनी अंगाभोवती लायटींग गुंडाळली आहे. तर सनी सिंह आणि ओमकार कपूर यांनी डोक्यावर एक मजेशीर अंदाजातील टोपी घातली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीप कांग करत आहेत.