आज रंगणार शिव-हीनाचं भांडण

    दिनांक :27-Jun-2019
मुंबई,
बिग बॉसच्या घरात काल 'टिकेल तोच टिकेल' हा टास्क सदस्यांवर सोपावण्यात आला. टीम A आणि टीम B अशा दोन टीम्समध्ये हा टास्क रंगणार आहे. काल सुरु झालेल्या या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला दुसऱ्या टीममधील सदस्याने बझर वाजण्याच्या आत उठवायचे आहे. टास्कच्या सुरुवातीला शिव सिंहासनवर बसला आणि त्याचे संरक्षण रुपाली करणार असे शिवने सांगितले. आता या टास्कमध्ये कोणती टीम जिंकेल? हे बघणे रंजक असणार आहे.

 
याचबरोबर नॉमिनेशन टास्कवरून देखील घरामध्ये किशोरी, पराग, रुपाली आणि वीणा शिववर नाराज आहेत. शिववर विश्वास ठेऊ शकत नाही असे पुन्हा पराग म्हणतो. वीणा आणि पराग मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडते. आज टास्कमध्ये किशोरी शहाणे आणि पराग सिंहासनावर बसणार आहेत. विरुध्द टीम पराग आणि किशोरी यांना सिंहासनावरून उठवण्यासाठी बरेच प्रयत्न करणार आहेत. करत असताना सदस्य कोणता मार्ग स्वीकारतील? काय काय करतील? कुठल्या नियमांचे उल्लंघन होईल ? हे आज समजेल.
टास्क सुरु असताना हीना आणि शिवमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये शिव हीनाला म्हणाला 'लेव्हल खाली पाडू नकोस हीना'. हीनाने असे काय केले कि शिवला राग अनावर झाला? पराग आणि किशोरी यांनी देखील संचालिका असलेल्या सुरेखा ताईना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला कि बळाचा वापर होत आहे, असे नाही करू शकत तरी देखील विरोधी टीम ऐकायला तयार नाही. पुढे टास्कमध्ये काय होईल? हे आज कळणार आहे.