तुमसरमध्ये वृक्षदिंडीचे भव्य स्वागत

    दिनांक :27-Jun-2019
एक गाव, एक पाणवठा, एक जंगल हे ब्रीद घेऊन ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे तुमसर मध्ये भव्य स्वागत झाले.
भंडारा जिल्ह्याला ५४ लाखाचे उद्दिष्ट
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपवनसंरक्षक भंडारा विवेक होसिंग यांची ग्वाही
तुमसर : महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी समाजाने या चळवळीत सहभाग घ्यावा, यासाठी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आयोजित आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली वृक्षदिंडी आज २७ जून दुपारी दोन वाजता भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आगमन झाले. वनगरपरिषद तुमसर येथील मैदानात या वृक्षारोपण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भंडारा जिल्ह्यात ५४ लाखाचे उद्दिष्ट असून आम्ही ५५ लाख झाडे तयार करून ठेवली आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था च्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्पर आहेत.
 
 
 
वन विभागातर्फे कन्या वन योजना राबविली जात आहे त्यात पाच सागाचे आणि पाच फळांचे झाडे देण्यात येणार आहे. रोपे आपल्या दारी यात सवलती च्या दरात मिळत असून यासर्वांचा लाभ घ्यावा असे उपवनसंरक्षक भंडारा विवेक होसिंग यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून सांगितले. २३ जूनला वर्धा जिल्ह्यातील आंजी येथून नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर येथून ही वृक्षदिंडी वृक्षलागवड कार्यक्रमाचे प्रचार प्रसार करीत उमरेड येथे दि २९ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिंडीची सांगता होणार आहे. यावृक्षदिंडी सोबत ६० ते ६५ कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, तारिक कुरेशी, आशिष वांदीले, मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, म्हाडा अध्यक्ष तारिक कुरेशी, पूर्व संघटन मंत्री आशिष वांदिले, प्रदेश उपाध्यक्ष किशोर पाटील, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन सचिव प्रशांत कामडी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग भंडारा राजकुमार विधाते, साहाय्यक वन संरक्षक पी जी कोडापे, तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी भालेकर, लुचे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक श्याम धुर्वे, सुरेश सवई, सुनील गफाट, प्रदेश नेते योगेश बंग, भोलानाथ सहारे, शैलेश ढोबळे, प्रसन्न हरताडकर, ऍड कोमलदादा गभने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन संचालन गौरव नवरखेले यांनी केले.