जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा मुंबईत शिल्लक

    दिनांक :27-Jun-2019
मुंबई: यंदा मान्सून लांबल्याने ग्रामीण भागासोबतच शहरी भागांनासुद्धा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबईत जुलैअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणी पुरवठय़ाद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेरपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल, असे पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.