अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना खुल्या आणि आरक्षित कोट्यातूही अर्ज करता येणार

    दिनांक :28-Jun-2019
मुंबई,
मराठा आरक्षण कोर्टाने वैध ठरवल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खुल्या प्रवर्गातून ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुन्हा एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग) आणि ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्याचा घेतला निर्णय सरकारने घेतला आहे.

 
एसईबीसी प्रवर्गात 34,251 राखीव जागांपैकी 4557, तर ईडब्लूएस प्रवर्गात 28,636 जागांपैकी 2600 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याने त्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची मुभा दिली जाणार आहे. शासन निर्णयात अकरावी प्रवेशासाठई एसईबीसी प्रवर्गासाठी 16 टक्के आणि ईडब्लूएस प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण वैध ठरवत त्यांना शिक्षणात 12 टक्के आरक्षण मंजूर केलं आहे.
यासाठी 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. त्यासोबतच या विध्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र स्वीकारले जाणार आहे. जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी तीन महिन्यांनाचा कालावधी दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रवेशासाठीची नवीन वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर केले जाईल.