बिचकुलेचा परतीचा मार्ग बंद ?

    दिनांक :28-Jun-2019
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा खंडणी प्रकरणातील जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद झाला आहे. अभिजीत बिचुकले मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना २१ जून रोजी अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती.
 
 
अभिजीत बिचुकले यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी जामीन झाल्यावर पोलिसांनी खंडणी प्रकरणात त्यांना अटक केली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.