बिग बींनी शेअर केला खास फोटो

    दिनांक :28-Jun-2019
बॉलिवूडचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन सध्या ‘चेहरे’ चित्रपटातील १४ मिनिटांच्या वनटेकमध्ये संवादामुळे चर्चेत आहेत तर दुसरीकडे ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील त्यांचा लूक लोकप्रिय ठरला आहे. तसेच अमिताभ सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अमिताभ त्यांच्या मनातील भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या कुटुंबातील तीन पिठ्यांचा पगडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
 
आता अमिताभ यांनी मुलागी श्वेता बच्चन हिच्या लहानपणीचा आणि आत्ताचा असे दोन फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यातील एक फोटो श्वेताच्या लहानपणीचा असून अमिताभ तिला कपडे घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये श्वेता आणि अमिताभ हसताना दिसत आहेत. ‘एक दिवस अशी होती, आणि कळालच नाही… अशी कधी झाली!’ असे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

 
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर खाते हॉक झाले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून अमिताभ बच्चन यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रोफाईलवर लव पाकिस्तान असा संदेशही लिहिण्यात आला होता. अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मीने त्यांचे अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले होते.