असे जपा डोळेे...

    दिनांक :28-Jun-2019
डोळा आपल्या शरिरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. डोळे बंद करून काम करण्याची वेळ आली तर काम करताना पुरता गोंधळ उडतो. अशा वेळी दृष्टीचं महत्व लक्षात येतं. डोळ्यांचं आरोग्य जपणं हे सध्याच्या युगात खुप गरजेचं झालं आहे. डोळ्यांच्या आयुष्याविषयी थोडंसं... 

 
  • डोळ्याच्या आसपास खाज येत असेल किंवा डोळ्यांची जळजळ होत असेल तर कोल्ड कॉम्प्रेस पध्द्‌त वापरता येते. या पध्दतीमध्ये एका सुती कापडामध्ये बर्फ गुंडाळून डोळ्यांवर आणि आजूबाजूच्या भागावर फिरवावा. यामुळे डोळ्याला थंडावा मिळतो.
  • टी बॅग हा देखील डोळ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. टी बॅग काही काळ फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर ती डोळ्यावर ठेवून शेक द्या.
  • डोळे दुखत असतील, त्यांची जळजळ होत असेल तर मीठ आणि पाणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मीठ हे अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणून काम करत असल्याने डोळे स्वच्छ राहण्यास मदत होते. नैसर्गिक आय वॉश बनवण्यासाठी डिस्टील पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून उकळा. थंड झाल्यानंतर त्या मिश्रणाने डोळे धुवा. डोळे दुखण्यापासून आराम मिळेल.
  • ग्रीन टीमुळे डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत होते. ग्रीन टी पावडर डिस्टील पाण्यामध्ये टाकून उकळा. मिश्रण थंड झाल्यानंतर या पाण्यानं डोळे धुवा. डोळ्यांचा थकवा निघून जाईल.
  • कोरफडीमध्ये अँटीफंगल घटक असतात. त्यामुळे डोळ्यांना संक्रमण होण्यापासून रोखता येतं. अशा वेळी कोरफडीचा गर डोळ्याभवती लावा.
  • डोळे सुजले असतील तर मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बंद डोळ्यांवर लावा. डोळ्यांची सूज कमी होईल.