संघमित्रा एक्सप्रेसने चिरडला बकर्‍यांचा कळप

    दिनांक :28-Jun-2019
70 पेक्षा अधिक बकर्‍या ठार
राजुरा: येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या चुनाळा रेल्वे स्थानकालगतच्या राजुरा-बल्लारपूर उड्डान पुलाजवळील रेल्वे कॉसिंगवर संघमित्रा एक्सप्रेसने बकर्‍यांचा कळप चिरडल्या गेला. यात 70 पेक्षा अधिक बकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 28 जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
 
 
 
रेल्वेलाईन लगतच्या एका शेतात संबंधित शेतमालकाने शेणखतासाठी चुनाळा येथील एका पेंढपाळाच्या बकर्‍यांचा कळप ठेवला होता. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कुत्रा भुंकल्याने बकर्‍या घाबरल्या व रेल्वे लाईनच्या दिशेने सुसाट धावत सुटल्या. त्याचवेळी येत असलेल्या संघमित्रा एक्सप्रेसने या बकर्‍याचा कळप चिरडल्या गेला. यात अनेक बकर्‍यांचे तुकडे झाले. तर काही बकर्‍यांचे पाय तुटले. रेल्वे लाईनवर रक्ताचा सडा व मांसाचे तुकडे पडले होते. यात 70 पेक्षा अधिक बकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मेंढपाळाचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांंगण्यात येत आहे.