द बर्निग ट्रॅव्हल्स

    दिनांक :28-Jun-2019
चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण
 
वाशीम: औरंगाबाद नागपूर महामार्गावर आज, 28 जून रोजी पहाटे दरम्यान सागर ट्रॅव्हलच्या धावत्या लक्झरी बसला अचानक आग लागली. चालक शिवाजी गवते यांच्या समयसूचकतेमुळे लक्झरी बसेस मधील 18 ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
 

 
 
 
नागपूर औरंगाबाद महामार्गावर महामार्गावर रात्रीदरम्यान लक्झरी बसेसचे अधिराज्य असते. रात्री सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे लक्झरी बसेस या महामार्गावर धावतात. गुरुवारी रात्री बीडवरून नागपूरकडे जाणारी  सागर ट्रॅव्हल्सची बस या मार्गावर धावत होती. शुक्रवारी सकाळी 5 वाजता दरम्यान किन्हीराजा गावानजीक या  बससचे लाईट अचानक बंद झाले. त्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याचे चालक शिवाजी गवते यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच वाहक महादेव गवते यांना ही बाब सांगून ताबडतोब गाडीतल्या प्रवाश्यांना खाली उतरविण्याच्या सूचना केल्या. दोघा भावांनी लक्झरी बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्यापूर्वी क्षणाचाही विलंब न करता  18 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. काही क्षणातच या बसला आग लागून तीचा कोळसा झाला. त्यामुळे वेळ आली होती पण काळ नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. घटनास्थळाला पोलिस कर्मचारी ज्ञानेश्‍वर राठोड यांनी भेट दिली आहे.