आणि सचिनने केली ११९ वर्षे जुन्या कारची सवारी

    दिनांक :29-Jun-2019
मुंबई,
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अलिशान कार चालवण्याचे प्रचंड वेड आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असलेल्या सचिनला विंटेज कार चालवण्याचा मोह आवरला नाही. ही कार चालवतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही कार ११९ वर्षे जुनी आहे. 
 
लंडनमधील रॉयल ऑटोमोबाइल्स क्लबला सचिनने भेट दिली. तिथे ११९ वर्षे जुनी कार त्याला दिसली. ही गाडी डाईमलर एजी या जर्मन कंपनीची आहे. कंपनीने १९०० मध्ये या मॉडेलची निर्मिती केली होती. वेल्स देशाचा तेव्हाचा राजकुमार अल्बर्ट एडवर्ड याच्याकडे ही कार होती. कार इतकी जुनी असूनही फोर स्पीड ट्रान्समिशन, १५२६ सीसीचं दुहेरी सिलिंडर एल्युमिनियम इंजिन असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स या कारमध्ये आहेत. ही कार प्रतितास ३८.६३ किमी वेगाने धावते.
 
 
आत्ताच्या कारमध्ये टिलर स्टिअरिंग वापरले जाते. मात्र या ११९ वर्षे जुन्या कारमध्ये रेग्युलर स्टिअरिंग वीइल आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ड्युअल इग्निशन आहे. म्हणजे, रेगुलर स्टार्ट टेक्नॉलॉजीसोबतच ओपन फ्लेम हीटेड हॉट ट्यूब्सही आहेत. विंटेज कार असल्याने फुट ऑपरेटेड एक्सलरेटर पॅडलऐवजी यात हँड थ्रॉटल वापरलं जात असे.
 
खुद्द सचिनने ही कार चालवतानाचा व्हिडिओ त्याच्या इंन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याच्या बाजूला मार्गदर्शन करणारी एक व्यक्तीही बसली आहे.