२५ मुस्लिम अल्पवयीन मुलांना गितांजली एक्स्प्रेसमध्ये पकडले !

    दिनांक :29-Jun-2019
वरठी : छत्तीसगढ रायपूर भागातून २० तो २५ मुस्लिम अल्पवयीन मुलांना गितांजली एक्स्प्रेसने वरठी भंडारा रोड रेल्वे स्थानकात उतरले असता भंडारा रोड रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांनी (RPF) ते बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली चौकशीदरम्यान ते रायपूर (छत्तीसगड) मधील रहिवासी असल्याचे आढळून आले रायपूर परिसरातून मुलं असून भंडारा मधील मदरशांमध्ये त्यांना शिक्षणाकरिता आणण्यात आले असल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर त्यांच्या बद्दल पूर्ण माहिती घेऊन त्यांना सोडण्यात आले.