भाविकांच्या कारला अज्ञात ट्रकची धडक

    दिनांक :29-Jun-2019
आठ प्रवासी जखमी 
गिरड/समुद्रपुर: तालुक्यातील नागपूर हैदराबाद मार्गावर हळगाववरून मारुती ओमणी काराने कानकाटी शिवारातील हनुमान मंदिरात स्वंपाकासासाठी जात असलेल्या हळगाव येथिल भाविकांच्या वाहनाला अज्ञात ट्रकने मागुन जबर धडक दिली. या अपघातात कार दुभाजकावर जाऊन पलटी झाली. या वेळी कार मधिल आठ भाविक गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये रमेश लशकरे, वनिता लशकरे,पिक्की बोदळकर,नैतिक भोयर, मंगला गिरी, शोभा गिरी,पिक्की गोधरकर, यांचा समावेश असुन काही जखमीचे नाव समजे नाही. २९ जुनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास समुद्रपुर तालुक्यातील हळगाव येथिल काही भाविक मारुती ओमणी काराने नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कानकाटी शिवारातील हनुमान मंदीरात दर्शनासाठी स्वपांकाचे साहित्य घेऊन जात असताना जाम कडुन नागपुर जात असलेल्या अज्ञात ट्रने कारला मागुन जबर धडक दिल्याने या कार दुभाजकावर जाऊन पलटी झाली. या धडकेत कार मधिल आठ भाविक गंभीर जखमी झाले यातिल गंभीर जखमीना तातकाळ जाम महामार्ग पोलिस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटिल पोलिस कर्मचारी शंकर भोयर, सचिन गाढवे,कांचन नवाते,प्रविण चव्हान,दिपक जाधव यांनी रुग्णवाहिकेचे डॉ उमेश पवार यांनी उपचार करीत समुद्रपुर येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आहे. धडक देणारा अज्ञात ट्रक अपघात होताच पसार झाला. पुढिल तपास समुद्रपुर पोलीस करीत आहे.