कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

    दिनांक :29-Jun-2019
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीही वाढली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत परिसरात अतिवृष्टी झाली असून येथे १२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 
 
कोल्हापुरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असला तरी पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. आज, शनिवारी दिवसभरही मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यात इतरत्र सरासरी ४०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.