महादेवाच्या पिंडीबाबत महत्त्वाचे...

    दिनांक :29-Jun-2019
भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती..
- घरात देवघरात महादेवांची पींड ठेवावी मूर्ती/ फोटो नाही.
- घरात देवघरातील पींडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा.
- पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र, शक्यतो पितळेची असावी.
- देवघरातील पींड 3 इंचा पेक्षा मोठी असू नये ती 3 इंच पेक्षा छोटी असावी.
- भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. जिथे महादेवांची मूर्ती/फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.
 
 
 
- जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पींडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृष्य रूपाने उपस्थित असतात. तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.
- महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पींड पूजन सांगीतले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्ती पीठांवर महादेवांची पींड लिंग रूपाने स्थापन केलेले समजते.
- 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते.
- महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जलाभिषेक करावा.
- महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात.
- महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान राहते.
- गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.
- श्रीमद्भागवतात म्हटले आहे की, महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.