ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे मुंबई प्रेस क्लब जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :29-Jun-2019
मुंबई: संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कारावास भोगणारे आणि पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मुंबई प्रेस क्लबचा यंदाचा रेडइंक २०१९ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणदिवे यांच्यासह ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार सेबेस्टियन डिसोझा यांनाही जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं. २८ जून रोजी एनसीपीएतील जमशेद भाभा सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.