#ICCWorldCup2019 : दक्षिण आफ्रिकेला धक्का; नगिदी भारताविरुद्ध सामन्यातून बाहेर

    दिनांक :03-Jun-2019
लंडन,
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी नगिडी दुखापतीमुळे भारताविरुद्ध पाच जून रोजी होणार्‍या विश्वचषक सामन्यात खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघव्यवस्थापनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 
 
बांगलादेशविरुद्ध रविवारी रंगलेल्या सामन्यादरम्यान नगिदीच्या पायाला दुखापत झाली. वेदनेमुळे तो केवळ चार षटकेच गोलंदाजी करू शकला होता.
 
नगिदीच्या दुखापतीचे सोमवारी स्कॅनिंग केले जाणार आहे, परंतु सद्यपरिस्थिती लक्षात घेता तो किमान सात ते दहा दिवस मैदानावर उतरू शकणार नाही, असे संघाचे डॉक्टर मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले. सावधगिरी म्हणून आम्ही त्याला यापुढे गोलंदाजी करण्याची परवानगी देणार नाही, असेही ते म्हणाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हा फार मोठा झटका असून ते विश्वचषकातील आपले दोन सामने हरले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना यजमान इंग्लंडने, तर रविवारी बांगलादेशने पराभूत केले होते.