इफ्तार पार्टीत स्फोट : 17 ठार, 25 जण जखमी

    दिनांक :03-Jun-2019
- मृतांमध्ये चार मुलांचा समावेश 
 
 
TB Online Desk
दमिश्क,
इफ्तार पार्टीवेळी सीरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आल्याने चार मुलांसमवेत 17 जण ठार, तर 25 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजाज शहरातील एका मशिदीबाहेर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला.
 
अजाज शहर आजही तुर्की समर्थित सीरियन दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. दरम्यान, रविवारी इस्रायलकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात दहा जण ठार झाले होते. त्यापूर्वी सीरियाने इस्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते. यापैकी एक इस्रायलच्या सीमेवर पडले होते. यामुळे इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात सीरियाचे पाच नागरिक आणि पाच सैनिक ठार झाले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, आमच्या सीमेवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. आम्हीही जोरदार प्रत्युत्तर देणार आहोत.