नौसैनिकांना कोकेन सेवन करताना पकडले

    दिनांक :03-Jun-2019
-ब्रिटिश पाणबुडीवरील घटना 

 
 
लंडन,
अण्वस्त्रसज्ज पाणबुडीमध्ये कोकेनचे सेवन करताना ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या नौसैनिकांनी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांना अमेरिकेच्या फ्लोरिडा बंदरानजीक पकडण्यात आले. तिघांचीही चाचणी पाणबुडीवरील गोपनीय कारवाईवेळी करण्यात आली होती. या सैनिकांना तातडीने उतरवल्यावर पाणबुडी स्कॉटलंडच्या नौदल तळावर नेण्यात आली आहे.
 
लष्करी सूत्रांनी डेलीमेलली दिलेल्या माहितीनुसार एचएमएस वेन्जेन्स या पाणबुडीवर कोकेन सेवन करणार्‍या नौसैनिकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांना पकडता आले नाही. या नौसैनिकांनी कुणकूण लागल्याने रक्तातून कोकेनचे अंश बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी प्यायले. यामुळे चाचणीमधून वाचले.
 
या पाणबुडीमध्ये 12 हजार किमीवर हल्ला करण्यास सक्षम क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत. पाणबुडीमध्ये 16 पेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याने नशेमध्ये असलेले नौसैनिक या पाणबुडीसाठी धोकादायक आहेत. याशिवाय हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा आठपट संहारक क्षमता असलेली आणि 10 हजार किमीवर हल्ला करू शकणारी ट्रायडेंट क्षेपणास्त्रेही पाणबुडीवर आहेत.
 
या क्षेपणास्त्राची तीन वर्षांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. यावेळी तिचा वेग 21 हजार किमी प्रती तास नोंदविण्यात आला होता.