ॲपलचे लोकप्रिय 'आय-ट्यून' ॲप होणार बंद

    दिनांक :03-Jun-2019
'ॲपल' कंपनीच्या दर्जेदार उत्पादनांचे चाहते असलेल्या ग्राहकांसाठी, विशेषत: संगीतप्रेमींसाठी धक्का देणारी बातमी आहे. डिजिटल संगीतात क्रांती आणणारं 'आय-ट्यून' हे प बंद करण्याचा निर्णय पलनं घेतला आहे.
 
 
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, आजपासून सुरू होणाऱ्या पलच्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये हे प अधिकृतरित्या बंद केलं जाणार आहे. 'आय-ट्यून' बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालली होती. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या, 'आय-ट्यून'च्या तोडीच्या इतर प्समुळे 'पल'ला होणारा तोटा स्पष्ट दिसत होता. या पार्श्वभूमीवर हे प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
'आय-ट्यून' २००१ साली पलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी सुरू केलं होतं. संगीत आणि चित्रपट प्रेमींमध्ये हे प प्रचंड लोकप्रिय होते. संगीताच्या क्षेत्रात होणाऱ्या पायरसी आणि चोरीला आळा घालण्यासाठी या पनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता साधारण १८ वर्षांनंतर 'आय-ट्यून' यूर्जसचा निरोप घेणार आहे.
 
असं असलं, तरी आय-ट्यून्स एका वेगळ्या मार्गाने यूजर्ससाठी उपलब्ध असेल. 'आय-ट्यून' मधील सॉग्न पर्चेस, फोन सिंकिंग यासारख्या सुविधा बंद करून उर्वरित सुविधा पल टीव्ही, पल म्यूझिक आणि पॉजकास्ट अशा तीन वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. पलच्या या निर्णयामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.