हवाई दलाचे AN-32 विमान बेपत्ता

    दिनांक :03-Jun-2019
भारतीय हवाई दलाटचे एएन -32 हे विमान गेल्या तीन तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. या विमानाने दुपारी 12.25 मिनिटांनी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून अरुणाचल प्रदेशमधील अॅडवांस लँडिंग ग्राउंड मेचुकासाठी उड्डाण घेतले होते. दुपारी 1 च्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या विमानाचा संपर्क होऊ शकला नाही.

 
गेल्या तीन तासांपासून एएन -32 हे विमान बेपत्ता असून याचा शोधकार्य सुरू आहे. या विमानात आठ 8 कर्मचारी आणि 5 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
दरम्यान, हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत.