कोहली आत्मविश्वासाने परिपूर्ण : रिचर्डस्‌

    दिनांक :03-Jun-2019
लंडन,
भारतीय कर्णधार विराट कोहली हा आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. त्याच्याइतका आत्मविश्वास अन्य कोणत्याही खेळाडूमध्ये नाही. लोक त्याच्या उद्धटपणाबाबत त्याच्यावर टीका करतात. पण मला असे वाटते की तो त्याचा आत्मविश्वास आहे, अशा शब्दात वेस्ट इंडीजचे महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्डस्‌ यांनी विराट कोहलीची प्रशंसा केली. 
 
 
रिचर्डस्‌ यांनी कर्णधार कोहलीची केलेली स्तुती ही भारतीय संघाला स्फूर्ती प्रदान करणारे ठरेल, असे मानले जात आहे. आगामी 5 जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफि‘केविरुद्ध होणार आहे.
 
मोठ्या स्पर्धेत खेळताना जे गुण खेळाडूंकडे असावेत असे वाटते, ते गुण कोहलीकडे आहेत. तो लढाऊवृत्तीचा आहे. उद्धटपणे खेळत नाही. उत्तम पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देतो म्हणूनच तो सर्वोत्तम खेळाडू आहे, असेही रिचर्डस्‌ म्हणाले.