दीदींचा ‘जय हिंद’चा नारा

    दिनांक :03-Jun-2019
- बदलला ट्विटर, फेसबुकचा चेहरा 

 
कोलकाता,
बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍यांवर भडकणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या ट्विटर आणि फेसबुकवरचा डीपी (डिस्प्ले प्रोफाइल) बदलला आहे. तृणमूलच्या बर्‍याच नेत्यांनी आता डीपीतून ‘जय हिंद, ‘जय बांगला’चा नारा दिला आहे.
 

 
 
डीपीमध्ये ‘जय हिंद’, ‘जय बांगला’च्या घोषणेसह अनेक महापुरुषांचा फोटोही पाहायला मिळत आहे. डीपीमध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग , मातंगिनी हाजरा, रवींद्रनाथ ठाकूर, कवी काजी नजरूल इस्लाम, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
 
निवडणुकीच्या निकालापूर्वी अमित शाह यांच्या बंगालमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या हिंसेमध्ये विद्यासागर यांची मूर्ती तोडण्यात आली होती. त्यानंतरही ममतांनी डीपीमध्ये विद्यासागर यांचा फोटो लावला होता.