गुप्तधन काढणारी टोळी जेरबंद

    दिनांक :30-Jun-2019

 ४,२८,८७९ रुपयांचा माल जप्त
 
वर्धा : वर्धा शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काळात घरफोडीचे अनेक गुन्हे झालेले असून घरफोड्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. याबाबत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा व मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी लक्षणीय दखल घेतली होती व सर्व संबंधीत अधीकारी व कर्मचारी यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करण्याबाबत कळवीले होते.
 

 
 
 
त्याअनुषगाने  निलेष एम. ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी वेगवेगळया पथकांना षहरात वेगवेगळया परिसरात गुप्त बातमीदार पेरण्यासाठी तसेच शहरामध्ये गस्त वाढविण्याचे आदेष दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे षाखेचे एक पथक वर्धा शहर व रामनगर परिसरात पेट्रोलींग करीत असताना एक इसम संशयितरित्या सोने विक्री करण्याच्या चर्चा करीत असल्याचे निदर्षनास आले. त्यावरून पंचासमक्ष सदर संशयीत इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव शेखर गोपालराव कांबळे असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून सखोल विचारपुस केली असता ८ ते ९ महिन्यापुर्वी रसुलाबाद येथून नवनित मदनलाल राठी यांच्या जुन्या वाडयातून सध्या फरार असलेल्या रोहीत कुसळे याचे मदतीने मेटल डिटेक्टरचा वापर करून जमिनीतून एक लोटा काढला. त्यामध्ये ६ सोन्याचे नाग, १ अंगठी व १ सोन्याचे ब्रासलेट असा माल मिळाला. तो आम्ही दोघांनी सारखा वाटून घेतला. तोच माल विक्री करण्याची चर्चा करीत असल्याबाबत सांगितले. त्यावरून आरोपी क्र. १ व २ यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी क्र. १ यांचे ताब्यातून १ वजनदार धातूचा लोटा अंदाजे किंमत ५०० रुपये,  जुने वापरते १,६४,२२ रुपयांचे दागिणे रतसेच आरोपी क्र. २ याचेकडून सोन्याचे आर्टिकल २,६४,१५७ रुपयांचा असा एकूण  ४,२८,८७९ रुपयांचा माल जप्त करण्यास आला. सदर दोन्ही आरोपीतांनी मालमत्तेबाबत असमाधानकारक उत्तरे दिल्याने व स्वताचे फायद्याकरीता शासनाला कसलीही माहिती न देता स्वताचे ताब्यात ठेवल्याने पुढील कारवाई करीता पो.स्टे. पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक  निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि अषिश मोरखडे, पोहवा. प्रमोद जांभुळकर, दिपक जाधव, पोना संजय बोगा, रामकृषण इंगळे, तुशार भुते, स्था. गु. शा. वर्धा यांनी केली.