गर्दीच्या वेळी ‘हॉलिडे स्पेशल’ नको : पीयूष गोयल

    दिनांक :30-Jun-2019
मुंबई: उपनगरीय रेल्वे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत का, असा सवाल करीत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. वेळापत्रकावर परिणाम होत असेल, तर गर्दीच्या वेळेत हॉलीडे स्पेशल, मेल-एक्स्प्रेस चालवू नका, असे आदेशही त्यांनी दिले. उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक, पादचारी पुलांची कामे, स्वच्छता आदी विषयांवर गोयल यांनी शनिवारी सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सातत्याने होणार्‍या तांत्रिक बिघाडाबाबतही नाराजी व्यक्त केली.