१ आणि २ जुलैला विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

    दिनांक :30-Jun-2019
नागपूर:  विदर्भात येत्या १ आणि २ जुलैला रेड अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात दमदार पाऊस होणार असल्याचे  सांगण्यात येत आहे.

 
 आज मुंबईत पावसाचा जोर ओसरलेला नाही. दिवसभर मुंबईकरांना सूर्यदर्शन झालेले नाही. सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. दाटून आलेले ढग अधूनमधून विश्रांती घेत बरसत आहेत. हवामान विभागाने सांगितले की, 'बंगालच्या उपसागरावर ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या ४८ तासांत याची तीव्रता वाढेल. या स्थितीमुळे मान्सून मध्य भारतात आणखी पुढे सरकेल. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून दबा धरून बसलेला पाऊस येत्या दोन दिवसात चांगलाच बरसू शकतो.