अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल राज्यात प्रथम

    दिनांक :04-Jun-2019
एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर 
 
 
अमरावती,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी करत अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल 99.98 टक्के गुणांसह प्रथम आला आहे. मुंबईच्या किमया शिकारखाने हीला सुद्धा सिद्धेश इतकेच गुण मिळाले आहे.
 
अमरावती शहरातल्या शारदा विहार परिसरात राहणार्‍या अग्रवाल कुटुंबीयांना दोन मुले आहेत. सिद्धेश लहानपणापासूनच चिकाटीने अभ्यास करतो. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी त्याने परिश्रम घेतले. त्यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांच्या पालकांनी सांगीतले. ते पुढे म्हाणाले, मुलाला मिळालेले हे यश पाहून आपल्याला आनंद झाला आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळते, असे मत सिद्धेशच्या पालकांनी व्यक्त केले आहे. या निकाला बद्दल बोलताना त्यांने सध्या दहावी आणि बारावीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करून मन लावून अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल, असा सल्ला दिला आहे. सिद्धेशचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
 
राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर 20, 930 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. PCM (Physics, Chemistry, Maths) विभागातून 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर PCB (Physics, Chemistry, Biology) या विभागातून 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.