भारत उद्या आफ्रिकेशी भिडणार

    दिनांक :04-Jun-2019
डेल स्टेन विश्वचषकाच्या बाहेर 

 
साऊदम्पटन, 
विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारी अस्वस्थ असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने आयसीसी विश्वचषक अभियानाला प्रारंभ करणार आहे. आफ्रिकेविरुद्ध वेगवान मारा करण्याची व्यूहरचना भारतीय संघाने आखली आहे.
विश्वचषक स्पर्धेत विजेतेदासाठी आव्हान देणार्‍या 10 संघातील अखेरचा संघ म्हणून भारतीय संघ आपले आव्हान उभे करणार आहे. विश्वचषकातील हा भारताचा पहिलाच सामना आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना आहे. आफ्रिकेने आधीचे दोन्ही संघाने गमावले आहे.
 
दक्षिण आफ्रिकेला साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर करण्याच्या उद्देशाने दोनवेळच्या विश्वविजेत्या भारतीय संघाने त्यांच्याविरुद्ध वेगवान गोलंदाजीचा मारा करण्याची व्यूहरचना आखली आहे. याची जबाबदारी जगातला अव्वल मानांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखालील वेगवान मार्‍यावर सोपविण्यात आली आहे. अर्थात बुमराहला मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्याची साथ राहीलच. भारताच्या आक‘मकणात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीची वैविध्यता राहील, परंतु इंग्लिश वातावरण प्रमुख अस्त्र म्हणून वेगवान गोलंदाजांचा वापर राहणार आहे. गोलंदाजी हे भारतीय संघाचे बलस्थान आहे, असे माजी फलंदाज संजय मांजरेकर म्हणाला. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे विजेतेपदाचे दावेदार असून न्यूझीलंड डार्क हॉर्स ठरू शकतो, असेही तो म्हणाला.
 
अलिकडेच कॅगिसो रबाडाने विराट कोहलीला डिवचले होते. कोहली अपरिपक्व खेळाडू असल्याचे रबाडाने म्हटले होते, त्यामुळे विराटही त्याला धडा शिकविण्यास सज्ज असेल.
 
रबाडा दक्षिण आफ्रिकेच्या जायबंद वेगवान मार्‍याचे नेतृत्व करेल. पायाच्या दुखापतीमुळे लुंगी नगिदी संघाच्या बाहेर झाला आहे. रविवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान नगिदीला दुखापत झाली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हासुद्धा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले. परंतु फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला स्टार फलंदाज हाशिम आमलाच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.
 
दक्षिण आफ्रिकेचा सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून, तर दुसर्‍या सामन्यात बांगलादेशकडून पराभूत झाल्यामुळे ते सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे संघात अस्वस्थता असली तरी अष्टपैलू अॅण्डिले फेहलुकवायोला आपल्या संघावर विश्वास आहे. आपला संघ अजूनही स्पर्धेत मुसंडी मारू शकतो, असा त्याला विश्वास आहे. आपला संघ स्पर्धेत परत येऊ शकतो, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॅक्वेस कॅलिस यानेही व्यक्त केला आहे. भारताविरुद्धखेळणे सोपे नाही, परंतु हा त्यांचा पहिला सामना आहे, तर आमचा तिसरा आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जर आम्ही िंजकलो, तर त्यानंतर आम्ही स्पर्धेत आपले आव्हान कायम राखू शकतो, असे कॅलिस म्हणाला.
 
प्रतिस्पर्धी संघ - 
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चल, शिखर धवन, महेंद्रिंसह धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व विजय शंकर.
 
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, जीन-पॉल डुमिनी, बिरान हेन्ड्रीक्स, इम्रान ताहीर, अईदीन मार्कराम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरीस, लुंगी नगिदी, ॲण्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी व रस्सी व्हॅन डेर दुस्सेन.