नकली ‘सौदी राजकुमार’ गजाआड

    दिनांक :04-Jun-2019
फ्लोरिडा: अमेरिकेत सुमारे तीस वर्षांपासून स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचे सांगणार्‍या व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्यात 18 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव अँंथनी गिग्नॅक, असे आहे. ही व्यक्ती वीस वर्षांपासून शाही जीवनशैलीने आयुष्य जगत होती. त्याला शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हा नकली राजकुमार खाजगी विमान आणि महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करीत होता. महागडे दागिने मिरवीत होता. त्याच्याकडे अनेक बिझनेस कार्डही होते.
कोलंबियामध्ये जन्मलेल्या गिग्नॅकला मिशीगनमधील एका परिवाराने दत्तक घेतले होते.
शुक्रवारी या स्वयंघोषित राजकुमाराच्या खोटेपणाचे भांडे फुटले. खटला दाखल होऊन त्याला शिक्षा झाली.
फ्लोरिडातील न्यायाधीश म्हणाले की, गिग्नॅक एक ठग आहे. त्याने गुंतवणुकदारांकडून 80 लाख डॉलर्स लुटण्यासाठी स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचे सांगितले आहे.