दुचाकी चोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :04-Jun-2019
 
सहा दुचाकी जप्त
 
 
अमरावती: दुचाकी चोरी करून त्याची विल्हेवाट लावणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करून पाच चोरट्यांना अटक केली आहे. त्यातील दोन अल्पवयीन आहे. त्यांच्याजळून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. गाडगे नगर पोलिसांच्या पथकाकडून कारवाई सोमवारी करण्यात आली.
 
 
 
 
शेगाव येथील पंकज गणेश खवले (वय 30), रोहित प्रेमदास तायडे (वय 29) तर मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील सुरेंद्र यशवंत सावळे (वय 34) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गाडगेनगर ठाण्यातील डीबी पथकातील शेखर गेडाम, सतीश देशमुख, विशाल वाकपांजर व सारंग आदमाणे हे शेगाव-रहाटगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन अल्पवयीन दुचाकी चोरीच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे आढळून आलेत. त्यांनी सदर अल्पवयीनांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यांनी एका दुचाकी चोरीची कबुली दिली. दुचाकी चोरी केल्यानंतर पंकज, रोहित व सुरेंद्र त्यांची विल्हेवाट लावतात. त्या माहितीच्या आधारे पंकज, रोहित व सुरेंद्र यांना अटक करण्यात आली. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पथकाने सखोल चौकशी केल्यावर त्यांनी दूचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 दूचाकी जप्त करण्यात आल्या आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.