हृतिकच्या 'सुपर ३०' चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :04-Jun-2019
हृतिक रोशनच्या आगामी 'सुपर ३०' चित्रपटाबाबत उत्सुकता असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. हृतिकच्या 'सुपर ३०' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताला विकसनशील देश म्हणून अनेकदा कमी लेखले जाते पण आज पेप्सिकोपासून गुगलपर्यंत सर्व बड्या कंपन्यांच्या प्रमुखपदी कोण आहे? असा प्रश्न विचारत ट्रेलरला सुरुवात होते.
 
 
 
भारतात बुद्धिमान आणि मोठी स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची कमतरता नाही, पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे स्त्रोत नाही ही समस्या अधोरेखित करत ही गोष्ट सुरु होते आणि एन्ट्री होते ती शिक्षकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या हृतिक रोशनची. या चित्रपटात हृतिक आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. मोठ्या पगाराची नोकरी नाकारत आनंद कुमार स्वत:ची संस्था सुरू करतात, गरीब घरातील हुशार मुलांना शिकवण्याचं ध्येय गाठीशी बांधतात आणि ते कसं पूर्ण करतात या सगळ्या घटनांचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'सुपर ३०' चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.