सोशल मीडिया झाला रवीना टंडनच्या मुलीचा फॅन

    दिनांक :04-Jun-2019
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे लाखो चाहते आहेत. पण आता सोशल मीडिया रवीनाच्या मुलीचाही फॅन झाला आहे. होय, रवीना टंडनची मुलगी फारशी लाईमलाईटमध्ये नसते. पण एका व्हिडीओमुळे ती अचानक चर्चेत आली. 
 

 
२००४ मध्ये रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. २००५ मध्ये तिने मुलगी राशाला जन्म दिला.बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे लाखो चाहते आहेत. पण आता सोशल मीडिया रवीनाच्या मुलीचाही फॅन झाला आहे. होय, रवीना टंडनची मुलगी फारशी लाईमलाईटमध्ये नसते. पण एका व्हिडीओमुळे ती अचानक चर्चेत आली.
 
 
 
या व्हिडीओत रवीना तिच्या वयोवृद्ध आईवडिलांसोबत दिसतेय. तिच्यासोबत तिची लेकही आहे. रवीनाने वडिलांचा हात पकडला आहे आणि हळूहळू त्यांना सोबत घेत ती चालते आहे. रवीनाची लेक सगळ्यांच्या समोर आहे. पण अचानक आपल्या आजीला चालताना त्रास होतोय, हे ती बघते आणि तशीच मागे वळत आजीच्या मदतीसाठी जाते. आजीचा हात पकडून ती तिला गाडीपर्यंत घेऊन जाते.
 
 
 
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रवीनाच्या लेकीचे जोरदार कौतुक होत आहे. फिल्म क्रिटिक भावना सोमय्या हिनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रवीना, खूप सुंदर....तुझी लेक किती जबाबदार आहे,’असे भावनाने लिहिले आहे.
 
 
 
अन्य युजर्सनेही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझी मुलगी खूप सुंदर आहे. सोबत जबाबदारही आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. खरे तर सोशल मीडिया फार क्वचित कुणाचे कौतुक करताना दिसतो. त्यामुळे सोशल मीडियावर रवीनाच्या लेकीचे कौतुक होत आहे म्हटल्यावर लगेच त्याची बातमी झाली.
 
रवीनाला चार मुले आहेत. १९९५ मध्ये तिने दोन मुलींना दत्तक घेतले होते. पूजा व छाया असे त्यांचे नाव. त्यावेळी पूजा ११ वर्षांची होती तर छाया ८ वर्षांची. रवीनाने या मुलींना दत्तक घेतले तेव्हा ती सिंगल होती. २००४ मध्ये रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. २००५ मध्ये तिने मुलगी राशाला जन्म दिला. यानंतर तीन वर्षांनंतर रवीनाचा मुलगा रणबीरवर्धनचा जन्म झाला.