ट्विटरवर गौतम गंभीर आणि मेहबुबा मुफ्ती भिडले

    दिनांक :04-Jun-2019
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्यात पुन्हा एकदा ट्विटर वॉर झाल्याचे पहायला मिळाले. मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्याला राजकीय समस्या असल्याचे म्हटले. तसेच हा मुद्दा सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबतच अन्य घटकांनाही सामिल करून घेण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
1947 पासून सर्वच सरकारांनी काश्मीरकडे सुरक्षेच्याच चष्म्यातून पाहिले. हा एक राजकीय मुद्दा आहे आणि तो पाकिस्तानसह अन्य घटकांच्या मदतीने राजकीय पातळीवरच सोडवायला हवा. बळाचा वापर करून यामध्ये त्वरित बदल करण्याची नव्या गृहमंत्र्यांची इच्छा हास्यास्पद असल्याचे मुफ्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले. यावर खा. गौतम गंभीर यांनी मुफ्ती यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला.
 
   
 
सर्वच काश्मीरचा प्रश्न सोडवण्याच्या गोष्टी करत आहेत. परंतु मेहबुबा मुफ्ती यांनी आमित शाह यांच्या प्रक्रियेसा क्रुर म्हणणे हेच हास्यास्पट असल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे. इतिहास आमच्या धैर्य आणि सहनशीलतेचा साक्षीदार आहे. पण जर जर दंडेली केल्यामुळे माझी लोकं सुरक्षित राहणार असतील, तर दंडेलीही चालेल असे त्यांनी नमूद केले. निवडणुकांपूर्वी भाजपाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि अनुच्छेद 35 A रद्द करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, खा. अमित शाह यांच्या खांद्यावर आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा भारत अधिक कठोरतेने सामना करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.