खेळ जिंकाच मात्र खेळाबरोबरचं… : पंतप्रधान मोदींच्या भारतीय संघाला शुभेच्छा

    दिनांक :05-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
नवी दिल्ली,
इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून विश्वचषक स्पर्धा सुरु होऊन तब्ब्ल आठवड्याभराने भारतीय संघ आज पहिल्यांदाच मैदानात उतराला आहे. सलामीच्या सामन्यामध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान दिले आहे.

 
 
दरम्यान, भारतीय संघ आज विश्वचषक स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असल्याने देशभरातील क्रिकेट फॅन्स भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. सलामीच्या सामन्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून भारतीय संघाला शुभेच्छा देताना, “भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या प्रवासाला आज सुरुवात केली. सर्व संघाला खूप खूप शुभेच्छा! मला आशा आहे की या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट रसिकांना दर्जेदार खेळाचा आनंद घेता येईल तसेच स्पर्धेमध्ये संघांकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्यात येईल. खेळ जिंका पण खेळाबरोबर हृदयही जिंका.” असा संदेश दिला आहे.