पतीने केली पत्नीची हत्या

    दिनांक :05-Jun-2019
- शिवर येथील घटना 
 
 
दर्यापुर,
दर्यापुर नजिकच्या शिवर येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी प्रहार मारून खुन केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली.
 
सोनाली प्रवीण पोहनकर (35) असे मृतक पत्नीचे नाव असून प्रवीण रमेश पोहनकर(38 ) असे हत्या करणार्‍या पतीचे नाव आहे. शिवर येथील रहिवासी असलेला प्रवीण हा बांधकामं मिस्त्रिचे काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. त्यातून तो मानसिक विक्षिप्त सारखा वागत असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी सकाळी 8वाजेदरम्यान पत्नी सोनाली ही पुजा करीत असताना आरोपी प्रवीणचा सोनाली सोबत वाद झाला.
 
प्रवीणने बाजूला असलेली लोखंडी प्रहार मृतक सोनालीच्या कपाळावर मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला दर्यापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृतक सोनालीला दोन लहान मुले असून या घटनेमुळे शिवर गावात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपी प्रवीण पोहनकर याला ताब्यात घेतले आहे.