भारत वि. दक्षिण आफ्रिका : हे आहेत प्रमुख खेळाडू

    दिनांक :05-Jun-2019
सृष्टी परचाके 
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास आठवडा उलटला तरी एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळल्यास, सर्वच सामने नीरस आणि रटाळ झाले आहेत. त्यामुळे सर्वानाच आता भारताच्या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. असंख्य चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडभूमीत दाखल झाला असून त्यांना विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात आत्मविश्वास काहीसा ढेपाळलेल्या दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागेल.
 
भारतीय फलंदाजांचा दबदबा
सध्याच्या युगातील कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जात आहे. पण या विश्वचषकाच्या निमित्ताने त्याचे नेतृत्वगुण अधोरेखित होणार आहेत. सध्याच्या भारतीय संघात कोहलीसह सामना एकहाती जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा असला तरी भारताला २०११च्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
'द रोज बाऊल' स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक असल्याने तसेच दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजांच्या दुखापतींमुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या दोन्ही सलामीवीरांना गेल्या पाच महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी करता आली नसली तरी त्यांच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. विराट कोहली सध्या चांगल्या लयीत असून लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा आणि केदार जाधव यांनी गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
भारतीय गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह सारख्या वेगवान गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कशी फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच फिरकीपटू युजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव काढून सुद्धा उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज
डेल स्टेनने विश्वचषकातून माघार घेतली आहे, तर लुंगी एन्गिडीने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा चेंडू हशिम अमलाच्या हेल्मेटवर आदळल्यामुळे तोसुद्धा जायबंदी झाला होता. तसेच खांगीसो रबडाकाढून सुद्धा उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

फलंदाजी
 
व्हॅन डर डुसेन, फॅफ डय़ू प्लेसिस आणि क्विंटन डी’कॉक ने मागच्या सामन्यात केलीली उत्तम खेळी आता ही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. तसेच हे तिघेही आपल्या संघासाठी महत्त्वाचे खेळाडू असून यांच्या संघ पूर्णपणे अवलंबून आहे.