गायीचे दूध २ रुपयांनी महागणार

    दिनांक :05-Jun-2019
अमूलच्या दुधाच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आज खासगी सहकारी दूध उत्पादकांच्या बैठकीत दूधदरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
 
 
यानुसार गायीच्या दुधाचे दर २ रुपये प्रति लिटर दराने वाढणार आहेत. नवे दर ८ जूनपासून लागू होणार आहेत. अमूल, मदर डेरी कंपनीच्या दुधाचे दरही अलीकडेच दोन रुपये प्रति लिटर दरांनी वाढले आहेत. तत्पूर्वी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती.