पंतप्रधानांसाठी अजगराच्या चामड्यापासून तयार केला बूट, ५० हजारांचा भरावा लागला दंड

    दिनांक :05-Jun-2019
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ईदची भेट देण्यासाठी एका चर्मकाराला बूट तयार करणं चांगलं महागात पडलं आहे. पाकिस्तानमधील नूरुद्दीन या चर्मकारानं अजगराच्या चामड्यापासून इम्रान खान यांना भेट देण्यासाठी एक बूट तयार केला. पण तो बूट इम्रान खान यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच त्याच्यावर कारवाई झाली. पख्तूनख्वा वन्यजीव विभागनं त्याला तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
 
पेशावरमधील जहांगीरपुरा बाजारामध्ये चर्मकार नूरुद्दीन यांची दुकान आहे. अजगराच्या चामड्यापासून बूट तयार केल्याचं समजताच पख्तूनख्वा वन्यजीव विभागनं नूरुद्दीन यांच्या दुकानावर धाड टाकली. वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करत ५० हजारांच्या दंडाची शिक्षा केली. ‘दंड भरल्यानंतर मला बूट मिळाले आहेत. आता मी पंतप्रधानांना भेट देऊ शकतो, असे चर्मकार नूरुद्दीन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.’ रिपोर्ट्सनुसार जप्त करण्यात आलेल्या बूटाला पेशावरमध्ये ‘कप्तान स्पेशल बूट’ म्हटले जाते.