#ICCWorldCup2019 : हा कॅच पाहिल्यावर चाहतेच करतायत 'त्याला' सॅल्यूट; पहा व्हिडीओ

    दिनांक :06-Jun-2019
नॉटिंगहम,  
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याची विकेट घेतल्यानंतर म्हणा किंवा एखादी कॅच पकडल्यावर करण्याची आनंद साजरा करण्याची शैली भन्नाटच आहे. सेलिब्रेशन करताला कॉट्रेल हा कडक सॅल्यूट ठोकतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेलने एक भन्नाट कॅच पकडली आणि त्यानंतर चाहतेच त्याला सॅल्यूट ठोकत आहेत. 
 
 
एकेकाळी 4 बाद 38 अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भन्नाट पुनरागमन केले. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला तारले. स्मिथने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला स्थैर्य मिळवून दिले. पण याच स्मिथचा अफलातून झेल कॉट्रेलने सीमारेषेवर पकडला आणि चाहत्यांनी एकच जल्लोश केला.
 
पहा व्हिडिओ : 
 
 
नेमके काय घडले
स्मिथने ओशाने थॉमसचा 45 षटकातील दुसरा चेंडू चांगलाच टोलवला. हा चेंडू आता थेट सीमारेषे पार जाणार आणि स्मिथला षटकार मिळणार असे वाटत होते. पण त्यावेळी कॉट्रेल धावून आला आणि त्याने चेंडू पकडला. पण त्यावेळी आपला पाय सीमारेषेला लागणार, हे त्याला कळून चुकले. त्यावेळी कॉट्रेलने चेंडू मैदानात उंच उडवला आणि त्यानंतर तो सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर काही क्षणातच तो मैदानात आला आणि त्याने अप्रतिम झेल टिपला.