तेलंगणातले १८ पैकी १२ आमदार ‘टीआसएस’ मध्ये दाखल

    दिनांक :06-Jun-2019
हैदराबाद,
लोकसभा निवडणुकीत सपाटून हार पत्करावी लागल्याचा परिणाम आत राज्या राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात राहणे धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच 12 आमदारांनी दिले आहे.

 
तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे 120 पैकी 91 जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम 7 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत. काँग्रेसच्या 19 पैकी 12 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे जाऊन काँगेस विधीसंमडळ पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
काँग्रेस प्रदेश समितीनेही नुकतेच आमदार रोहित रेड्डी हे राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच टीआरएस पक्षात जातील असे म्हटले होते. रेड्डी यांचे गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर टीआरएसने निलंबन केले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या 12 आमदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याने आता काँग्रेसकडे 6 आमदारांचे संख्याबळ राहिले आहे.
 
काँग्रेसचा गट विलिनीकरण करण्याच्या पत्रावरून तेलंगणा प्रदेश प्रमुख एन उत्तम कुमार रेड्डी यांनी आम्ही लोकशाहीनुसार त्यांच्यासोबत लढणार असून सकाळपासून विधानसभा अध्यक्ष आम्हाला सापडत नव्हते. तुम्ही आम्हाला शोधण्यासाठी मदत करा, असे सांगितले.