गैरकायदेशीर पद्धतीने मतदारयादीतून नाव गहाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

    दिनांक :06-Jun-2019
- टाकळी धारोवासीयांची मागणी

तभा ऑनलाईन टीम
बुलढाणा,
मतदार याद्यांमधून गावातील सुमारे ६२ मतदारांची नवे बेकायदा गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आज गुरुवारी टाकळी धारवच्या प्रभागातील मतदारांनी शेगांव तहसीलदारांना केली आहे.
 
गावकऱ्यांनी केलेल्या निवेदनात, मौजे टाकळी धारव या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्या सौ. शुभांगि ढगे ह्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र सादर न झाल्यामुळे या प्रभागात पोटनिवडणुक आहे.
 
२०१७ मध्ये या प्रभागासहीत संपुर्ण ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्यावेळी या संपुर्ण 62 महिला पुरुष मतदारांचे नाव प्रभाग क्र. 2 च्या यादीत होते. आता 23 जुन रोजी पोटनिवडणूक आहे. त्याकरीता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेखा कडाळे या कार्यकर्त्यांसह आल्या असता त्यांच्या हे लक्षात आले की, या प्रभागातील 62 मतदारांची नावे गहाळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तसेच दुसऱ्या प्रभागातील नावे प्रभाग 2 च्या यादीत गेले. त्यामुळे सरळसरळ त्या दुस-या प्रभागातील मतदारांना परत मतदानाची संधी विनाकारण मिळणार आहे परंतू जे प्रभाग 2चे हक्काचे मतदार आहेत. या मतदारांना मतदानापासून वंचीत ठेवण्याचा डाव कुटिल राजकारणाचा भाग असुन संबधीत कर्मचारी अधीकारी यांची त्याला संपुर्ण साथ आहे असे निवेदनात म्हटले आहे.