मॅकडॉनल्‍ड बर्गरमध्ये किडे, तक्रारदाराला भरापाई म्हणून मिळाले ७० हजार

    दिनांक :06-Jun-2019
पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीला मॅकडॉनल्‍ड बर्गर खाल्यामुळे रूग्णालयात जावं लागले होतं. प्रत्यक्षात त्या व्यक्तिने कीडा असलेले बर्गर नकळत खाल्लं ज्याबद्दल त्याला नंतर रुग्णालयात गेल्यानंतर समजलं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीनं याबबात मॅकडॉनल्‍डकडे याची तक्रार केली होती. मात्र, कंपनीनं हरेरावी करत त्या व्यक्तीला टाळलं. त्या व्यक्तीनं त्यानंतर ग्राहक मंचाकडे धाव घेतली. तब्बल पाच वर्षानंतर ग्राहक मंचानं भारतीय मॅकडॉनल्‍डला त्या व्यक्तीला ७० हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहे.
 
 
दिल्लीजवळी नोयडामध्ये जीआयपी मॉलमध्ये हा प्रकार घडला होता. तक्रारदार व्यक्तीनं मॅकडॉनल्ड्समध्ये खूप सारे खाद्य-पदार्थाची ऑर्डर केली. ज्यामध्ये आलू टिक्की बर्गरचा समावेश होता. आलु टिक्कीचे काही घास खाताच त्याला उलटी होण्यास सुरूवात झाली. त्याच्या काही काळानंतर असे लक्षात आले की त्याने जो बर्गर खाल्ला त्यात कीडा होता.
ग्राहक मंचानं या सर्व प्रकारावर माहिती मिळवली. ग्राहक मंचानं भारतीय मॅकडॉनल्ड्सवर कारवाई करत तक्रारदार व्यक्तीला ७० हजार रूपये देण्याचा आदेश दिला. पीडित व्यक्तीला ७०,००० रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामध्ये ८९५ रूपये उपचारासाठी, ५०,००० रूपये मानसिक त्रासासाठी आणि २०,००० रूपये न्यायालयीन दंड करण्यात आल्याची माहिती खाद्य निरीक्षकानं सांगितले.