गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या कारभारावर लोकायुक्तांचे ताशेरे

    दिनांक :06-Jun-2019
मुंबईतील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहारकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी आपल्या चौकशी अहवालात ताशेरे ओढले आहे. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे मेहता यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. शिवाय विरोधकांनी भाजपावर देखीप टीका करणे सुरू केले आहे. या अहवलात मेहता यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे एबीपी माझाशी बोलताना मेहतांनी म्हटले आहे. तसेच, केवळ सुत्रांच्या माहितीवरून विरोधकांनी असे आरोप करणे चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितले.
 
 
ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून या प्रकरणाच्या फाईलवर मारण्यात आला होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करण्यात आलच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. खरेतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू करण्या अगोदर रद्द त्याला स्थगिती दिली. मात्र निर्णय घेताना मेहता यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केल्याचे अहवलात म्हटले आहे.
याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, असुन मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अगोदरही एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता.