सोनमनं कतरिनाला दिलं सडेतोड उत्तर

    दिनांक :06-Jun-2019
मुंबई:
कधी-कधी सोशल मीडियावर कलाकारांच्या कशा शाब्दिक चकमकी उडतात ते आपण पाहतो. कतरिना आणि सोनम कपूर यांच्यात नुकताच असा खटका उडाला. अभिनेत्री जान्हवी कपूर याचं कारण ठरली.
 
 
 
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या जिम लूकबद्दल कतरिना कैफ अलीकडेच एका चॅट शोमध्ये म्हणाली, की 'जान्हवीचे जिमचे कपडे हे खूपच छोटे असतात. मला तिची काळजी वाटते.' आपल्या बहिणीबद्दल जाहीर शोमध्ये असं काहीसं बोलणं सोनमला खटकलं. त्यावर सोनम कपूरनं जान्हवीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्याबरोबर लिहिलं, 'ती दररोजचे कपडेही घालते आणि त्यातही सुंदर दिसते.
सोनमनं कतरिनाला मारलेल्या या टोमण्यानंतर कतरिना मात्र शांत आहे. तिनं सोनमला त्यावर अद्याप काही उत्तर दिलेलं नाही.