विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी जुलैमध्ये होणार निवृत्त

    दिनांक :06-Jun-2019
‘विप्रो’चे संस्थापक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अझीम प्रेमजी हे ३० जुलै रोजी निवृत्त होत आहेत. कंपनीने गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. अझीम प्रेमजी यांनी ५३ वर्षे कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि कंपनीला नव्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
 
  
अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जागा त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी घेतील. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दाली नीमुचवाला हे ३१ जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहतील, असे कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
 
 
 
निवृत्तीनंतर अझीम प्रेमजी ३१ जुलैपासून पाच वर्षांसाठी कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. त्याचबरोबर कंपनीने अझीम प्रेमजी यांना संस्थापक-अध्यक्ष म्हणून सन्मानित केले आहे.