आरोग्यदायी कलिंगड

    दिनांक :07-Jun-2019
निसर्गानेच उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी काही फळे खास या काळासाठी दिली आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘किंलगड!’ उन्हाळ्यात हे सहज मिळते. खूप पाणी किंलगडात असते आणि हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. 
 
 
हे फळ अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते. शरीरातील खनिजे उन्हाळ्यात घामातून निघून जातात, पण किंलगड खाल्ल्याने तहान भागते आणि शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते. सूर्यकिरणांच्या थेट मार्‍यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.
 
किंलगडात इतर फळांच्या तुलनेत पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्‌भवणार्‍या मूत्राशयाच्या विकारांवर किंलगडाचे सेवन लाभदायक ठरते. जेवणानंतर किंलगड खाणे हे जास्त उपयुक्त ठरते.
 
किंलगड 78% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे. उन्हाळ्यात किंलगडाएवढे उत्साहवर्धक पेय दुसरे नाही. किंलगडातील पाण्याने पोट भरते. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.