तुझीच रे... २१ जून रोजी होणार प्रदर्शित

    दिनांक :07-Jun-2019
प्रेम हे हल्ली सैराटमय झाले आहे. एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्याला आवडला म्हणजे, हाच आपला जन्मसाथी आहे असे समजून मागचा पुढचा विचार न करता, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्याचे काय परिणाम होतात? ते त्यांनाच माहीत. आजच्या या तरुण पिढीला वास्तवतेचे भान राहत नाही. त्यांच्या या प्रेमामुळे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतात? याचे या कुटुंबावर कसे पडसाद कसे उमटतात?
हेच पडसाद ‘तुझीच रे...’ या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न निर्माती बेला सँमसन ग्रेशियस यांनी केला आहे. प्रवीण राजा दिग्दर्शित हा चित्रपट दि. २१ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. सँमसन ग्रेशियस यांची कथा असून पटकथा सुरेश बाल्मिकी यांनी लिहिली असून संवाद अजय राणे यांचे आहेत.
 
 
दिग्दर्शक प्रवीण राजा हे कौटुंबिक मित्र. त्यामुळे आम्ही दोघांनी निर्मितीचे धाडस केले. प्रवीणजींचा दिग्दर्शनाचा दांडगा अनुभव. विषय चांगला होता. मी आतापर्यंत दहा चित्रपट दिग्दर्शित केले आहेत; पण वसईमध्ये चित्रीकरणाचा चांगला अनुभव मिळाला.
तुझीच रे... चित्रपटात तीन गाणी आहेत. ती सँमसन ग्रेशियस, सागर खेडेकर, इयन हंट यांनी लिहिली असून संगीत फ्रान्सिस जिगुल यांनी दिले आहे. सावणी रवींद्र, महेंद्र कारले, विवेक नाईक, पल्लवी पाडगावकर, मंगेश शिर्के व इयान हंट यांनी आवाज दिला आहे.
तुझीच रे.... प्रियंका यादव, मिलिंद गवळी, सुमुखी पेंडसे, आनंदा कारेकर, प्रतिभा शिंपी, जयू चौंबल, सागर खेडेकर व अक्षय कांबळी या उदयोन्मुख कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.