दुबईत बस अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

    दिनांक :07-Jun-2019
 
दुबई: दुबईत खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात १७ लोक ठार झाले. मृतांमध्ये  ८ भारतीयांचाही समावेश आहे. बससाठी प्रतिबंधित असलेल्या रस्त्यावरून बस नेल्यानंतर ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत ९ जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
 
 
 
दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या अपघातात ८ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती दूतावासाने ट्विटद्वारे दिली आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या बसमध्ये एकूण ३१ पर्यटक प्रवास करत होते. ही बस एका बॅरियरला धडकली. बसच्या डाव्याबाजूचा भाग बॅरियरला धडकल्याने बसमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला.