महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करू या

    दिनांक :07-Jun-2019
- कुरेशींचे जयशंकर यांना पत्र
इस्लामाबाद,
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमुद कुरेशी यांनी भारतातील समपदस्थ एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आणि दक्षिण आशियात शांततेसाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचे सांगत, काश्मीरसह महत्त्वाच्या मुद्यांवर आपण चर्चा करायला हवी, असे नमूद केले.
 
 
 
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून आपली नियुक्ती झाली, यासाठी आपले अभिनंदन. आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे आणि त्यासाठी काश्मीरसह सर्वच मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये पुलवामा हल्ल्यावरून तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव द्विपक्षीय संबंधाच्या हितात नसल्याने, तो कमी करण्यावर आपण भर द्यायला हवा. तुमच्या नेतृत्वात ही बाब नक्कीच शक्य होईल, असा मला विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.