कोठा येथे स्वाईन फ्लुची लागण ; महीलेचा मृत्यु

    दिनांक :07-Jun-2019
मालेगाव: तालुक्यातील मौजे कोठा येथे स्वाईन फ्लु ची लागण झाली असुन या फ्लु ने आतापर्यंत एक ३५ वर्षीय महीला दगावली असुन तिचीच जाऊ औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आली आहे . तर अनेक रुग्णांना या रोगाची लक्षणे दिसु लागली असुन त्यामुळे गावामधे भितीचे वातावरण पसरले आहें . या संदर्भातील माहीती मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ .एस पी बोरसे यांना मिळताच त्यांनी डॉक्टरांचे एक पथक तात्काळ लगेच कोठा येथे पाठविले आहे .
 
 
 
 
कोठा येथील गंगुबाई मनोहर अवचार वय ३५ वर्ष या महीलेला गत आठ ते दहा दिवसापासुन ताप येत होता . त्यामुळे त्यांनी पहीले दोन तिन दिवस शिरपुर येथे खाजगी दवाखान्यात उपचार केले . त्याचा काही उपयोग झाला नाही म्हनुन वाशिम येथेही तीन त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले . तेथेही आराम पडत नसल्याने त्यांना अकोला येथे आयकॉन हॉस्पीटल मधे भरती केले . मात्र दोन दिवस उपचार सुरु असतांना ६ जुन रोजी सायंकाळी ५ वाजताचे
सुमारास त्यांचा मृत्यू झाला . त्यांची च एक ३२ वर्षीय जाऊबाई सौ उमा प्रभाकर अवचार यांचे वर अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांना ६ जुन रोजी रात्री तेथुन औरंगाबाद येथे धुत हॉस्पीटल मधे हलविण्यात आले आहे . आणखीही दोन महीला पेशंटला तशीच लक्षणे दिसु लागल्याने ७ जुन रोजी अकोला येथे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले आहे . तसेच गावामधे इतरही ५ ते ७ रुग्णांना या रोगाची लक्षणे दिसत असुन गावामधे भितीचे वातावरण पसरले आहे . आधीच दुष्काळाच्या झळा आणी त्यातच स्वाईन फ्लू सारख्या जिवघेण्या आजाराचा विळखा.
त्यामुळे गावकरी धास्तावले आहेत.